मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात; लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा मुंबईचा राजा, परळसह शहरातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पारंपरिक पद्धतीने निघाल्या आहेत. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने मुंबईचा परिसर दुमदुमून गेला आहे.

लालबागच्या राजाची निरोपाची आरती पार पडल्यानंतर राजाची भव्य विसर्जन मिरवणूक सुरू झाली. मिरवणूक लालबाग परिसरातून गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होत असून, या मार्गावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीसह प्रमुख विसर्जन स्थळांवर सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🌺

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *