नागपुरातील श्रुतीची नायजेरियात मोठी कामगिरी

नागपूरची फेन्सिंगपटू श्रुती जोशी हिने नायजेरियात झालेल्या आंतरराष्ट्रीय फेन्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

या स्पर्धेत श्रुतीने टीम गोल्ड आणि वैयक्तिक ब्राँझ पदक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत तिने आपल्या कौशल्याची आणि मेहनतीची प्रभावी छाप पाडली.

श्रुतीच्या या यशामुळे नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तिच्या या यशाने शहरातील युवा खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची प्रेरणा मिळाली आहे.

कठोर सराव, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर श्रुतीने मिळवलेले हे यश नागपूरसाठी अभिमानाची बाब ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *