पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद सरकर सर्व घटकांचा विकास करीत आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वातील महा‘अडाणी’ आघाडीची नियत साफ नाही. अशी खरमरीत टीका योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली.
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद सरकर सर्व घटकांचा विकास करीत आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वातील महा‘अडाणी’ आघाडीची नियत साफ नाही. त्यांच्याकडे कुठले नैतिक बळ देखील नाही. महाआघाडीच्या खटारा गाडीचे चाके निखळली असून त्याचे चालक होण्यासाठी मात्र त्यांच्यात चढाओढ लागली आहे, अशी खरमरीत टीका योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली.
पोहरादेवी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार बाबुसिंग महाराज, उमेदवार सई डहाके, श्याम खोडे, भाजपचे कार्याध्यक्ष राजू पाटील राजे आदींसह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘कटेंगे तो बटेंगे, एक हैं तो सेफ हैं’ याचा पुनरुच्चार करीत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, कधी बंजारा समाजाचा आपल्या अस्तित्वासाठी लढा होता. बंजारा समाज सत्ता आणि शासनाच्या मुख्यधारेत जोडला गेला आहेत. बाबुसिंग महाराज यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले. बंजारा समाजाची काशी पोहरादेवीचे विकास व सौंदर्यीकरण कार्य आणखी वेगाने पुढे जाईल. समाज विरोधी व देशद्रोही बंजारा समाजाची दिशाभूल करून धर्मांतरण करण्याचे प्रयत्न करीत होते, ते आता यशस्वी होऊ शकणार नाहीत.
भारताच्या सुरक्षेचा काँग्रेसनेच खेळखंडोबा केला होता. देशात एक वेळ अशी होती की, पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करत होते, देशात घुसखोरी सुरू होती. देशात कुठेची बॉम्बस्फोट घडवून आणले जात होते. चीन भारताच्या जमिनीवर अतिक्रमण करीत होता. काँग्रेसकडे कारवाईची मागणी केल्यावर त्यांच्या नेत्यांना मात्र संबंध बिघडण्याची काळजी होती, देशाची चिंता नव्हती, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला.
भाजपची सन्मानाची भावना
देशातील प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास होत आहे. पोहरादेवी येथील धार्मिक स्थळाला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झाले. भाजपची ही परंपरेप्रति सन्मानाची भावना आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.