‘पक्ष फोडायला अक्कल लागत नाही’, शरद पवारांचा फडणवीसांवर घणाघात

“शिंदेंनी काही लोक घेतले आणि गुहाटीला जाऊन बसले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? पक्ष फोडल्याचे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले. पक्ष उभा करायला अक्कल लागते. मात्र फोडायला अक्कल लागत नाही”, असा घणाघात शरद पवारांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे प्रचारसभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही”, अशा शब्दांत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला. यावेळी त्यांनी आमदार प्राजक्त तणपुरे यांचंदेखील कौतुक केलं. “पक्ष निर्माण करायला अक्कल लागते. फोडायला लागत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 30-40 आमदार गोळा केले. गुवाहाटीला जाऊन बसले. ही एक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होती. उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात होती. असं असतानाही त्यांनी पक्ष फोडण्याची भूमिका घेतली. लोकांना हे पटलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात मोठं काम काय केलं? विचारल्यानंतर पक्ष फोडला म्हणून सांगतात. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही”, असा घणाघात शरद पवारांनी आपल्या भाषणात केला.

“लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राहुरीला आलो होतो. तुम्ही आपला उमेदवार निवडून दिला त्याबद्दल तुमचे आभार. मागच्यावेळी काँग्रेसचा एक आणि आमचे चार खासदार होते. मात्र घटना धोक्यात असल्याने तुम्ही आमचे 31 खासदार निवडून दिले. आता भाजप आणि आमच्यातल्या फुटून गेलेल्या लोकांचे राज्य आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेकजण मंत्री होते. मात्र शिंदेंनी काही लोक घेतले आणि गुहाटीला जाऊन बसले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? पक्ष फोडल्याचे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले. पक्ष उभा करायला अक्कल लागते. मात्र फोडायला अक्कल लागत नाही”, असा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला.

‘त्याने घटाघटा विष पिलं आणि…’

“देशात आम्ही सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंडिया आघाडी स्थापन केली. 400 डाव उद्ध्वस्त करायचं ठरवलं. डाव उद्ध्वस्थ करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे होतं. निवडणुका आल्यानंतर आम्ही भूमिका मांडली. ज्या महाराष्ट्रात कॉंग्रेसचा 1 खासदार, राष्ट्रवादीचे 4 खासदार होते. तुम्ही आम्हाला 48 पैकी 31 खासदार दिले, राष्ट्रवादीला 8 खासदार दिले. लोकसभेच्या निकालानंतर यांची चिंता वाढली. नवनवीन योजना आणताय. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर यांनी काही योजना राबवल्या. मात्र आज महाराष्ट्रात स्त्रिया सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात अनेक बहिणींचा पत्ता लागत नाही आणि तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता. आज महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात 1100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं पीक वाया गेलं, शेतकऱ्याला कर्ज फेडता आलं नाही. पीकाला भाव मिळाला नाही. त्याने घटाघटा विष पिलं आणि आत्महत्या केली. त्यामुळे भाजपला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही”, अशी टीका शरद पवारांनी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link