KL Rahul: “मला थोडं स्वातंत्र्य मिळेल अशा संघात…”, केएल राहुलचे लखनौने रिलीज केल्यानंतर मोठं वक्तव्य, संघ सोडण्यामागचं सांगितलं कारण

KL Rahul Reveals Reason of LSG Exit: लखनौ सुपर जायंट्सने संघाचा कर्णधार केएल राहुलला मेगा लिलावापूर्वी रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राहुल लखनौ संघ सोडणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. आयपीएल संघांची रिटेंशन यादी जाहीर झाल्यानंतर राहुलला लखनौ संघाने रिटेन केले नव्हते. आता केएल राहुलने एलएसजी संघ सोडण्यावर पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे.

केएल राहुलने भारताच्या टी-२० संघात परतण्याची इच्छा व्यक्त केली आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ का सोडला हे देखील सांगितले. केएल राहुल हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे, पण आजपर्यंत तो त्याच्या प्रतिभेचा पूर्ण क्षमतेने वापर करू शकला नाही.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना राहुल म्हणाला, “मला नव्याने सुरुवात करायची होती, मला माझे पर्याय शोधायचे होते आणि मला अशा संघातून खेळायचं आहे जिथे मला खेळण्यासाठी थोडं स्वातंत्र्य मिळेल आणि संघातलं वातावरणही हसतखेळत असेल. काहीवेळा तुम्हाला फक्त पुढे जाऊन स्वतःसाठी काहीतरी चांगलं शोधण्याची गरज असते.”

केएल राहुलने टीम इंडियासाठी शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला टी-२० संघात संधी मिळालेली नाही. आता टीम इंडियात पुनरागमन करण्याबाबत राहुल म्हणाला की, “मी भारतीय संघातून गेल्या काही काळापासून बाहेर आहे आणि मला माहितीय की एक खेळाडू म्हणून मी कोणत्या वळणावर उभा आहे. पुनरागमनासाठी मला काय करायचं आहे, याचा अंदाजही मला आहे. म्हणूनच मी येत्या आयपीएल सीझनची वाट पाहत आहे. आयपीएल जे मला पुनरागमनासाठी आणि माझ्या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. माझे ध्येय निश्चितपणे भारतीय टी-२० संघात पुनरागमन करण्याचे आहे.”

एलएसजीपासून वेगळे झाल्यानंतर केएल राहुल यावेळी मेगा लिलावात सामील होणार आहे. यावेळी केएल राहुल कोणत्या संघाचा भाग होणार याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघ राहुलवर बोली लावण्यासाठी उत्सुक आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link