दीपिका पादुकोण- रणवीर सिंगच्या लेकीसाठी नेटकऱ्यांनी सुचवली सुंदर नावं, तुम्हाला ‘या’ यादीतील कोणतं नाव आवडलं?

Names for Deepika Padukone-Ranveer Singh Baby Girl: अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने रविवारी (८ सप्टेंबरला) गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लेकीच्या जन्माबाबत माहिती दिली. त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर सोशल मीडियावर तिच्या नावाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. नेटकरी अनेक नावं या जोडप्याच्या मुलीसाठी सुचवत आहेत.

विराट व अनुष्काच्या नावातील काही शब्द वापरून चाहते त्यांच्या जोडीला विरुष्का म्हणतात. याप्रमाणे रणवीर व दीपिका दोघांच्या नावातील काही शब्द वापरून चाहते मुलीसाठी नाव सुचवत आहेत. त्यापैकी एक नाव रविका आहे. चाहते सोशल मीडियावर या जोडप्याने लेकीचं नाव रविका ठेवायला हवं असं म्हणत आहेत. तर इतर अनेकांनी वेगवेगळी नावं सुचवली आहेत.

एका चाहत्यांनी मुलीचं नाव रिधी ठेवावं असं सुचवलं. यामध्ये रणवीरचा र येतो तर दीपिकाच्या नावाचा दी येतो. तसेच तिचा जन्म गणेशोत्सवादरम्यान झाला. त्यामुळे रणवीर व दीपिकाने मुलीचं नाव रिधी ठेवावं, असं एका चाहत्याने सुचवलं. तर, काहींना रविका नाव फारच आवडलं. रविकाचा अर्थ सूर्याची किरण असा होतो. हे नावही खूपच सुंदर आहे, असं चाहते म्हणत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या एका चाहत्याने एक्सवर पोस्ट करत लिहिलं, “रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी त्यांच्या मुलीचे नाव पद्मावती किंवा रमा ठेवावं. कारण कल्की पुराणानुसार भगवान काली या दोन राजकन्येशी लग्न करतील. दीपिकाने कल्कि 2898 मध्ये दमदार काम केलं होतं.”

मुलीच्या जन्माच्या दोन दिवसाआधीच दीपिका व रणवीर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते. यावेळी हिरव्या रंगाच्या साडीत दीपिका खूपच सुंदर दिसत होती, तर रणवीरने ऑफ व्हाईट कुर्ता-पायजामा घातला होता. कुटुंबासह जोडीने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी दीपिकाला मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे तिने रविवारी ८ सप्टेंबरला मुलीला जन्म दिला.

दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची प्रभास व अमिताभ बच्चन यांच्यासह ‘कल्की 2898 एडी’मध्ये झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवसर जबरदस्त कमाई केली. ‘सिंघम अगेन’ हा तिचा आगामी चित्रपट आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link