Kalki 2898 AD: प्रभासचा चित्रपट ‘या’ दोन OTT प्लॅटफॉर्म्सवर होणार प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार सिनेमा? जाणून घ्या

Kalki 2898 AD OTT रिलीज: अमिताभ बच्चन, प्रभास, आणि दीपिका पादुकोण यांच्या स्टारकास्टने सजलेला २०२४ मधील ब्लॉकबस्टर सिनेमा ‘कल्की 2898 एडी’ आता ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची तारीख अखेर जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट एक नाही तर दोन ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होणार आहे. दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्म्सने याबाबत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट्स शेअर केल्या आहेत.

प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांच्या तगड्या स्टारकास्टने भरलेल्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर यश मिळवले आहे. २७ जून रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी शानदार ओपनिंग घेतली होती. यानंतरही या चित्रपटाने सतत चांगली कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Kalki 2898 AD एकूण कलेक्शन: या चित्रपटाने जगभरात १०४२ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे, त्यापैकी ७६७ कोटी रुपयांची कमाई फक्त भारतात झाली आहे. बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर येणार आहे. ज्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता आला नाही, त्यांना तो आता ओटीटीवर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट दोन ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.

‘कल्की 2898 एडी’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर येणार?
‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट २२ ऑगस्टपासून नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर उपलब्ध होणार आहे. नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत तर प्राइम व्हिडिओवर तामिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेत हा चित्रपट पाहता येईल. दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्म्सने याबाबत इन्स्टाग्रामवरून माहिती दिली आहे.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे, तर एसएस राजामौली, विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान यांच्यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या पाहुण्या भूमिका आहेत.

‘कल्की 2898 एडी’ च्या सीक्वेलची तयारी सुरू
‘कल्की 2898 एडी’ च्या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर निर्माते आता चित्रपटाच्या सीक्वेलची तयारी करत आहेत. या सीक्वेलमध्ये कर्ण, अश्वत्थामा, आणि यास्किन यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

‘कल्की 2898 एडी’ चं बजेट किती?
Kalki 2898 AD Budget: ‘कल्की 2898 एडी’ हा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. तब्बल ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १००० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. आता प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link