पुण्यात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने एका व्यक्तीची तब्बल ₹70 लाखांची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर ठगांनी संबंधित व्यक्तीला कायदेशीर कारवाईची भीती दाखवत त्याच्यावर दबाव आणला आणि विविध कारणे सांगून मोठी रक्कम ऑनलाइन वळती करून घेतली.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून नागरिकांनी अशा प्रकारच्या फेक कॉल, व्हिडिओ कॉल किंवा ‘डिजिटल अरेस्ट’च्या धमक्यांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
⚠️ लक्षात ठेवा: कोणतीही सरकारी यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाही.
