दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; मुंबई उच्च न्यायालयाचा CBI चौकशीचा आदेश

मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. न्यायालयाने या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, FIR नोंदवण्याचे आदेशही दिले आहेत.

दिशा सालियन यांच्या वडिलांनी सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय देण्यात आला. न्यायालयाने CBI च्या वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याने तपास करण्याचे निर्देश दिले असून, मुंबई पोलिसांना संबंधित प्रकरणाची कागदपत्रे CBI कडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, न्यायालयाने तपासादरम्यान पुरेसा पुरावा मिळाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील CBI तपासात प्रकरणातील सर्व परिस्थितींची नव्याने चौकशी केली जाणार आहे.

या निर्णयानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशभरात चर्चा सुरू झाली असून, CBI तपासातून पुढे कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *