स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाच्या विस्ताराला मंत्रिमंडळ मंजुरी देऊन केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवेल, अशी माहितीही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास येत असल्याने सध्याचे मार्ग आणि प्रस्तावित मार्गांचा विस्तार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सिंहगड रोडवरील खराडी ते कोल्हेवाडी या प्रस्तावित 25.65 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचा खडकवासला धरणापर्यंत विस्तार करण्याबाबत विचार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1