CM Eknath Shinde : राज्यात प्रचारांचा धडाका सुरू असून विविध जिल्ह्यांत, शहरांत जाण्यासाठी रस्ते मार्गे जाण्यापेक्षा हवाई उड्डाणांना प्राधान्य दिलं जातं. तसंच, निवडणूक काळात पैशांचा अपहार होऊ नये म्हणून जागोजागी तपासणी केली जात आहे. तसंच, विविध हॅलिपॅडवरही प्रचारासाठी जाणाऱ्या नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर त्यांनी याप्रकरणी टीका केली. परंतु, आता देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बॅग तपासली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बॅगांची आज तपासणी करण्यात आली. यासंदर्भात एएनआयने व्हिडिओ शेअर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर आहेत. पालघर दौऱ्यावर असताना त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टोलाही लगावला. “माझ्या बॅगेत फक्त कपडे आहेत. युरिन पॉट नाहीय”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वणी त्यांची बॅग तपासण्यात आली होती. यावरून शरद पवारांनीही टीका केली. त्यानंतर औसा येथील सभेदरम्यानही त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. या दोन्ही दिवशी बॅग तपासल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची तपासणी करण्यता आली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांचीही तपासणी करण्यात आली.