Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा देखील जबरदस्त पार पडला असून आता सातवा आठवडा सुरू झाला आहे. या सातव्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड एन्ट्री होणार आहे. रविवार झालेल्या भाऊच्या धक्क्यावर वाइल्ड एन्ट्रीची ओळख झाली. त्यानंतर आज हा वाइल्ड कार्ड स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन राडा करणार आहे.
कोल्हापुरचा लोकप्रिय बॉडीबिल्डर संग्राम चौगुले यांची वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली आहे. पण घरातील स्पर्धकांना आजच्या भागात वाइल्ड कार्ड एन्ट्रीबाबत खुलासा होणार आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्री येण्याची कल्पना बिग बॉसने ( Bigg Boss Marathi ) घरातील स्पर्धकांना दिली आहे. त्यामुळे स्पर्धक अनेक तर्क-वितर्क लावताना दिसत आहेत. अशातच सूरच चव्हाण, अंकिता वालावलकर, वैभव चव्हाण यांचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
टीआरपी मराठी’ या इन्स्टाग्राम चॅनलवर ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातील व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये वैभव सूरज चव्हाणचं म्हणणं अंकिताला सांगतो की, ऐ अंकिता, कोणी तरी पोरगी आली तर मजाच आहे, असं सूरज म्हणतोय. यावर अंकिता म्हणते, “बाबा तू चुकीचं गेम समजतोय. तू जरा थंड घे.” त्यानंतर निक्की म्हणते, “मी तुझ्या सपोर्टमध्ये आहे.” मग अंकिताच्या बाजूला बसलेला अरबाज सांगतो की, “बघा कसा लाजतोय?”
पंढरीनाथ कांबळेची काय प्रतिक्रिया होती?
यानंतर अंकिता पॅडी दादाला बोलावते आणि मालवणीत सांगते, “पॅडी दादा, पहिल्यांदा इकडे या. याला समजवता समजवता हा चुकीचा गेम समजू लागला आहे. आता मगापासून म्हणतायत कोणतरी आज येणार आहे. तर हा म्हणतोय, कोणतरी पोरगी यायला पाहिजे. याच काय करायचं?” यानंतर वैभव पॅडी दादाला सांगतो की, बघा कसा लाजतोय. शेवटी पंढरीनाथ सूरज चव्हाण जवळ जाऊन म्हणतो की, मग इतके दिवस मी काय करत होतो. त्यानंतर निक्की म्हणते, “याला कोण तरी मैत्रीण पाहिजे म्हणतोय.”
पंढरीनाथ सूरज चव्हाण विचारतो की, पोरगी आली तर पटवणार का? सूरज म्हणतो, “हो.” तितक्यात धनंजय पोवार उठतो आणि म्हणतो, “जर आज पोरगी आली तिच्याबरोबर मी तुझं प्रेम प्रकरण पूर्ण करून देतो.”
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातील हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहेत. नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अरे बाबा तुमच्याबरोबर सूरज चव्हाण मजाक करतोय’, असं एका नेटकऱ्याने लिहिलं आहे. तसंच अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.