मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या आठ जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. मालेगाव हे आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्वात उष्ण क्षेत्र ठरले असून पारा ४३ अंश सेल्सिअस आहे.
IMD ने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1