India Vs Pakistan World Cup Match Live Updates: विश्वचषक 2023 मधील सर्वात मोठा सामना आज (14 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात आहे. भारताने नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलने टीम इंडियात प्रवेश केला आहे, हे त्याचे विश्वचषक पदार्पण आहे. तर इशान किशनला संघातून वगळण्यात आले आहे. पाकिस्तान संघाने गेल्या सामन्यातील विजयी संघात कोणताही बदल केलेला नाही.
या सामन्यापूर्वी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकदिवसीय विश्वचषकात सात वेळा आमनेसामने आले आहेत. सात वेळा भारतीय संघाने पाकिस्तानचा वाईट पद्धतीने पराभव केला आहे. दोन्ही देशांमधील हा एकूण 135 वा एकदिवसीय सामना आहे. याआधी दोन्ही देशांमध्ये १३४ सामने खेळले गेले आहेत. भारताने 56 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे वनडे विश्वचषकात जेव्हाही दोन्ही देश आमनेसामने आले आहेत, तेव्हा सातही वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.