Bhool Bhulaiyaa 3 teaser :’आमी जे तुमार…’ पुन्हा ऐकू येणार…; विद्या बालनचं ‘भूल भुलैय्या ३’ सिनेमात पुनरागमन, कार्तिक आर्यनच्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित

Bhool Bhulaiyaa 3 teaser : अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भूल भुलैया’ २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली होती आणि यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, दुसऱ्या भागात अक्षय कुमार नसून कार्तिक आर्यनल आहे हे समजल्यावर कार्तिकला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र २०२२ साली ‘भूल भुलैय्या ‘२ आल्यांनतर कार्तिकच्या कामाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८५ कोटी रुपयांची मोठी कमाई केली.

आता या चित्रपटाचा तिसरा भाग येत असून, त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये कार्तिक आर्यनबरोबर विद्या बालनचीही झलक दिसत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

विद्याचं पुनरागमन आणि पहिल्या भागाची आठवण

टीझरची सुरुवात ‘अमी जे तुमार’ या गाण्याने होते आणि त्याबरोबरच विद्या बालनच्या पुनरागमनाची झलक आपल्याला दिसते. यावेळी ती एक जड खुर्ची उचलताना दिसत असून जोरात किंचाळताना दिसते. हा सीन पाहून ‘भूल भुलैय्या’च्या पहिल्या भागातील त्या भयानक सीनची आठवण होते, त्या सीनमध्ये विद्या बालनच्या पात्राने एका हाताने पलंग उचलला होता.

कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रुह बाबा’ या भूत पकडणाऱ्या पात्राच्या भूमिकेत परतला आहे. त्याला मंजुलिकाच्या आत्म्याला पकडण्याचं काम दिलं जातं. या भागात तृप्ती डिमरी कार्तिकच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच माधुरी दीक्षित देखील या चित्रपटाचा भाग असल्याच्या अफवा होत्या, परंतु टीझरमध्ये तिची झलक दिसत नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link