महाराष्ट्रातील भाजपाचे महत्त्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासू वृत्ती व हजरजबाबीपणा सर्वांना ठाऊक आहे. मुद्दा समजून सांगण्यात त्यांचा हातखंडा असून, ते प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर तसेच विधानसभेच्या पटलावरही त्यांचा हा आत्मविश्वास जाणवतो. अनेक वेळा कठीण राजकीय प्रश्नांवर ते हसत-खिदळत उत्तरे देतात. याच स्वभावाचा नमुना त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दाखवला.
देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये सविस्तर मुलाखत दिली, ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. अजित पवारांसोबतची युती, तिच्यावरची टीका, लोकसभा निवडणुकीतील अपयश आणि विधानसभा निवडणुकीची तयारी यावर त्यांनी खुलासा केला. पण मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी केलेल्या एका मजेदार टिप्पणीने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
“देवेंद्र नाही, देवेंद्र!” मुलाखतीच्या सुरूवातीस, मुलाखतकाराने देवेंद्र फडणवीस यांना ‘देवेंद्र भाई’ असे संबोधले. त्यावर फडणवीसांनी लगेच उत्तर दिलं, “एक रिक्वेस्ट आहे. देवेंदर नाही, देवेंद्र. शुद्ध मराठी माणूस आहे भैय्या.” त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला, आणि प्रश्न विचारणाऱ्यांनी फडणवीसांच्या हजरजबाबीपणाची प्रशंसा केली.
“फक्त नावात थोडी चूक झाली म्हणून…” ‘मराठी अभिमान म्हणून का?’ असा प्रश्न विचारल्यावर फडणवीसांनी पुन्हा हास्याची लकेर वसूल केली. “आम्ही संपूर्ण देशाला एक मानतो. फक्त नावात थोडी चूक झाली म्हणून सांगतोय,” असे ते म्हणाले.
आर्थिक कामगिरीवरही त्यांनी भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा २३ वरून ९ वर खाली आल्यामुळे कामगिरीबाबत चर्चा सुरू झाली आहे. यावर त्यांनी स्पष्ट केले की, “भाजपा कमजोर झालेली नाही. भाजपाला कमकुवत म्हणणं हे चुकीचं विश्लेषण आहे. ९ जागा जिंकल्या असून, १२ जागांवर ३ टक्क्यांपेक्षा कमी फरकाने हरले.”
“स्ट्राईकरेटला काही महत्त्व नाही” त्याचप्रमाणे, लोकसभा निवडणुकीत जागा लढवल्यानंतर जिंकण्याबाबत विचारल्यावर फडणवीसांनी उत्तर दिलं, “स्ट्राईकरेटला काही महत्त्व नाही. आकडे तुम्हाला हवे तसे सांगता येतात. एक व्यक्ती एका बॉलमध्ये चार धावा काढून बाद झाला तर त्याचा स्ट्राईक रेट जास्त राहील. महाराष्ट्रात भाजपाच क्रमांक एकचा पक्ष आहे आणि राहील,” असे ते म्हणाले.