Duleep Trophy 2024 : रिंकू सिंगचे नशीब चमकले, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर होताच मिळाली आनंदाची बातमी

Rinku Singh receives call up for Duleep Trophy 2024 : भारताचा युवा स्टार रिंकू सिंगचे नशीब अचानक उजळले आहे. आता त्याची दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ज्यासाठी त्याची यापूर्वी निवड झाली नव्हती. रिंकू सिंगला दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आले आहे. यूपी टी-२० लीगमध्ये मेरठ मावेरिक्सचे कर्णधारपद भूषवणारा २६ वर्षीय खेळाडू रिंकूचा दुलीप ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी भारत ब मध्ये समावेश करण्यात आला आहे.

दुलीप ट्रॉफीसाठी इंडिया ब मध्ये निवड झाल्यामुळे रिंकू यूपी टी-२० लीगमध्ये मेरठ मावेरिक्ससाठी खेळू शकणार नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रिंकूला अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील संघात खेळायचे आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशातील एकूण ४ खेळाडू पुढे सहभागी होणार आहेत. दुसरीकडे, ध्रुव जुरेल आणि यश दयाल पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीत. १९ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी दोघांची टीम इंडियात निवड झाली आहे.

उत्तर प्रदेशचे खेळाडू रिंकू आणि आकिब खान दुलीफ ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. रिंकूने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “माझे काम कठोर परिश्रम करणे आहे आणि मला दुलीप ट्रॉफीसाठी बोलावण्यात आल्याने मी आनंदी आहे. जेव्हा या स्पर्धेसाठी सुरुवातीला संघ जाहीर झाले, तेव्हा माझी निवड झाली नव्हती. त्यामुळे निराश झालो होतो. पण आज मी खूप उत्साही आहे. कारण मला प्रतिष्ठित दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ब संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.”

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील रिंकू सिंगची कामगिरी –

रिंकूने भारतीय संघासाठी आतापर्यंत टी-२० सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणीतही त्याचा कामगिरी चांगली आहे. त्याने ४७ सामन्यात ५४.७ च्या सरासरीने ३१७३ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये रिंकूची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १६३ आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ब बद्दल बोलायचे तर, पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करत भारत अ संघाचा पराभव केला. या संघासाठी मुशीर खानने पहिल्या डावात १८१ धावा केल्या होत्या. भारत ब आता १२ सप्टेंबरपासून भारत क विरुद्ध खेळणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link