ठरलं तर मग: प्रतिमा आत्याच आता स्वतः आठवणी जागृत करण्याचा प्रयत्न करणार! नाण्यामुळे आठवणी परत येतील का? ‘ठरलं तर मग’मध्ये नवीन ट्विस्ट

Tharala Tar Mag 17 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता एक महत्वपूर्ण वळण पाहायला मिळणार आहे. प्रतिमा आत्या स्वतः आपल्या विसरलेल्या आठवणी जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे सायलीला खूप आनंद होईल. प्रतिमा आत्यांचा भूतकाळ आठवण्यासाठी कोणीतरी मुद्दाम प्रयत्न केले तर त्यांना त्रास होईल आणि त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो, असे अश्विनने आधीच सांगितले आहे. पण जर प्रतिमा आत्यांनी स्वतः प्रयत्न केला, तर त्यांना त्रास होणार नाही. त्यामुळे सायलीने तिचे वेगळे प्रयत्न सुरू केले आहेत.

सायली प्रतिमा आत्यांच्या खोलीत त्यांच्या जुन्या आठवणी ठेवल्या आहेत—जुना मोठा फोटो, सुभेदारांची चांदीची नाणी आणि इतर पुरावे. या गोष्टी पाहून प्रतिमा आत्या स्वतः प्रयत्न करतील, असे सायलीला वाटते. यासाठी सायलीने जेवणाच्या प्रयोगानंतर प्रतिमा आत्यांना रांगोळी काढायला सुचवले आहे. प्रतिमा आत्यांनीही सायलीच्या या मागणीला होकार दिला असून, सुभेदारांच्या अंगणात सुंदर रांगोळी काढणार आहेत.

सायली प्रतिमा आत्यांच्या रूममध्ये वाकून बघताना एक आनंददायक दृश्य पाहणार आहे—प्रतिमा आत्या आपल्या माहेरचं नाणं हातात घेऊन ते निरखून बघताना दिसतील. हे दृश्य पाहून सायली आनंदी होईल आणि ती धावत पूर्णा आजी आणि कल्पना आईकडे जाणार आहे. सायली त्यांना ही आनंदाची बातमी देईल आणि म्हणेल की प्रतिमा आत्या स्वतः प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यांची स्मृती नक्कीच परत येईल. यामुळे पूर्णा आजी आणि कल्पना आईदेखील आनंदित होणार आहेत. पण या गोड संवादामुळे प्रियाला चांगलीच बोच होईल.

प्रिया आता चांगलीच कोंडीत अडकली आहे. एका बाजूला प्रतिमा घरात परतल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला रविराजसमोर प्रतिमाची खोटी मृतदेह आणि खोटा डीएनए रिपोर्ट देणाऱ्या नर्सचे सत्य उघडले आहे. रविराज स्वतः सत्य शोधून काढणार आहे, त्यामुळे प्रियाचे कारनामे आता उघड होण्याची शक्यता आहे. प्रियानेच हे सर्व घडवून आणले असल्यामुळे ती अधिकच बिथरली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link