अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी आमदारकीची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. येत्या 19 तारखेला आम्ही आमच्या मागण्या सरकारला सांगू आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या तर मी निवडणूक लढवणार नाही, असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
कडू म्हणाले, “आमची तिसरी युती नाही त्यामुळे आम्ही शेतकरी, शेतमजूर यांची युती करणार आहोत.” महायुतीसोबत असल्याच्या प्रश्नावर कडू म्हणाले, मी महायुतीत असल्याचे तुम्हाला कोणी सांगितले?
कडू म्हणाले की, आपण महायुतीला पत्र देवून पेरणीपासून कापणीपर्यंतची कामे रोजगार हमीसह शासनाकडे मांडणार आहोत, शेतकऱ्यांना ५० टक्के नफा द्यावा, दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये द्यावेत, समाजात समानता आणावी आदी मागण्या मांडणार आहोत. .
सरकारने या मागण्या पूर्ण केल्या तर मी निवडणूक लढवणार नाही, असे ते म्हणाले. माझी जागा मी महायुतीला देणार असल्याचे ते म्हणाले.