दि. ०७ एप्रिल २०२४ रोजी रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी शिवसेना नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथशिंदेसाहेब यांनी पदाधिकारी, कार्यकर्तांशी संवाद साधून त्यांना पुन्हा एकदा रामटेक मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आणि मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे जागतिक पटलावर देशाचे नाव अभिमानाने घेतले जात आहे. देशाचा सर्वांगीण विकास करून विकसित भारत बनवणे हा त्यांचा अजेंडा आहे, मात्र आगामी निवडणुकीत मोदीजींचे हात बळकट करून विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी केले. तसेच अब की बार चारसो पार हा नारा यशस्वी करून दाखवण्यासाठी मोठ्या जोमाने कामाला लागा असे आवाहन देखील केले.
यावेळी रामटेक लोकसभा क्षेत्राचे विद्यमान श्री खासदार कृपाल तुमाने, नागपूर जिल्हा ग्रामीणप्रमुख श्री संदिप इटकेलवार, माजी मंत्री दीपक सावंत, रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री आशिष जयस्वाल, आमदार मनीषा कायंदे, धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षयमहाराज भोसले, शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव तसेच रामटेक लोकसभा अंतर्गत येणाऱ्या तालुक्यांचे तालुका प्रमुख, बूथ प्रमुख, शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.