महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत मानापमान नाट्य रंगले.
वर्धा : महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत मानापमान नाट्य रंगले. व्यासपीठावर स्थान असणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेस नेत्यांना स्थानाचं नसल्याने नाराजीचे सूर उमटले.
काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप हे नाराज होत शेवटी प्रेक्षकांत बसले. माजी आमदार नरेंद्र ठाकरे हे पण गर्दीत होते. त्यांना वारंवार विनंती करूनही ते उठायला तयार झाले नाही. शेखर शेंडे हे शेवटी सुरक्षा अधिकाऱ्यांवर संतापले. अभिजित वंजारी व अन्य नेत्यांची नावे नसल्याबद्दल प्रवीण हिवरे यांनी नाराजी नोंदविली.
शरद पवार या सभेस उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. तसेच ते मिरवणुकीतही सहभागी होत अर्ज दाखल करतेवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहणार असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. मात्र सभा सूरू होण्यापूर्वीच झालेला गोंधळ चांगलाच चर्चेत आला आहे.