दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमची तात्पुरती इमारत कोसळली, आठ जण जखमी

जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या गेट क्रमांक २ जवळ उभारण्यात आलेली तात्पुरती इमारत कोसळल्याने आठहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील तात्पुरती इमारत शनिवारी कोसळली, त्यात किमान आठ जण जखमी झाले. अजून दोन जणांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्टेडियमच्या गेट क्रमांक 2 जवळ ही घटना घडली, जिथे काही काम सुरू होते, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली.

घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील एका व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी घटनास्थळी दिसत आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्याने दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link