Pravin Darekar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत आहेत. जे पहिले कल हाती येत आहेत त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या दरम्यान भाजपा नेते प्रवीण दरेकर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्या पक्षाच्या जागा जास्त असतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. भाजपाच्या जागा जास्त येत आहेत हे दिसून येतं आहे. आमच्या जवळपास १२५ जागा येतील त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का? असं विचारलं असता त्यांनी होय असं उत्तर दिलं आहे.
Maharashtra Assembly Election 2024 results महाराष्ट्रात २०१९ ला काय घडलं होतं?
महाराष्ट्रात २०१९ ला महायुतीला कौल मिळाला होता. भाजपाला १०५ जागा आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. महायुतीला जनतेने कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन भाजपा आणि शिवसेना यांच्यातले वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर महायुती तुटली. या घटनेनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष येऊन सरकार उदयाला आलं आणि उद्धव ठाकरे अडीच वर्षे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०२२ ला हे सरकार पडलं. २०२३ ला अजित पवारही महायुतीच्या सत्तेत आले.