महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग (MSCBC) हे सर्वेक्षण करत आहे.
मराठा समाजाचे “मागासलेपण” मोजण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या सर्वेक्षणाला 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
“सर्वेक्षणाचा कालावधी 31 जानेवारी 2024 पर्यंत होता. तथापि, काही ठिकाणी सर्वेक्षणासाठी अधिक वेळ लागत असल्याने, सर्वेक्षणाची अंतिम मुदत 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे,” एमएससीबीसीने बुधवारी जाहीर सूचनेमध्ये म्हटले आहे.
सर्वेक्षणासाठी प्रगणकांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत.
सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये प्रश्नावलीद्वारे भरली जात आहे.हे कुटुंब राखीव प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची अधिक माहिती घेतली जात नाही.
MSCBC ने नागरिकांना प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.