आई तुळजा भवानी आरती

जय देवी तुळजा अंबाई

चंड मुंड वधुनिया महिषासुर वधुनिया

ठेविलासे तुझे पायी || धृ ||

वाघावर स्वार झाली

हाती सोन्याचे गोट,

सोन्याचे गोट

बाजूबंद दंडामधी

जय देवी जय देवी तुळजा अंबाई || १ ||

आई तुझे दरबारी

लाख खंडीभर तेल,

खंडीभर तेल

जैसे कोदीमध्ये

जय देवी जय देवी तुळजा अंबाई || २ ||

कवड्याची गळी माळ

करते भक्तांचा संभाळ,

भक्तांचा संभाळ

तुळजापूरची माता भवानी

आरती करतो नेमाने

करतो नेमाने

जय देवी जय देवी तुळजा अंबाई || ३ ||

जय देवी जय देवी तुळजा भवानी

जय देवी जय देवी तुळजा भवानी

चंड मुंड वधुनिया महिषासुर वधुनिया

ठेविलासे तुझे पायी ||

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link