“सर्वात आधी घाव तुझ्यावर आणि माझ्यावर घालणार…” धनंजय पोवार अंकिताला कोणाविषयी असं बोलला? जाणून घ्या…

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ पाचव्या पर्वातील पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. कोल्हापुरचा लोकप्रिय बॉडीबिल्डर संग्राम चौगुले ‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धेत उतरला आहे. त्यामुळे आता संग्रामच्या एन्ट्रीनंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धकांची समीकरण बदलणार का? संग्राम कोणत्या ग्रुपमधून खेळणार? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळात मिळणार आहेत. अशातच अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवारचा एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे.

‘कलर्स मराठी’ने नुकताच अंकिता व धनंजयचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघं अभिजीत आणि स्वतःच्या ग्रुपविषयी बोलत आहेत. हे ऐकून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने अंकितावर टीका करत म्हटलं आहे, “अगं खरी पलटू तर तू आहेस. डीपी दादाला नॉमिनेशनमध्ये आणणारी पलटू.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अंकिता खूप कपटी आहे. अभिजीतचा कामापुरता वापर करून घेते.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “या जळक्या अंकिताला लवकर घराबाहेर काढा. स्वतःला काय समजते काय माहित”, अशा अनेक नेटकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहे. पण व्हिडीओमध्ये नेमकं अंकिता व धनंजय काय बोलले आहेत? जाणून घ्या…

या व्हिडीओत, जीममध्ये व्यायाम करत असलेल्या डीपीला अंकिता बोलावून घेते. म्हणते, “डीपी दादा…तुम्ही नॉमिनेशनमध्ये होता तेव्हा तुम्ही मला एक वाक्य विश्वासाबद्दल बोलला होता. मला अशी पलटणारी लोक (अभिजीत सावंत) खूप डेंजर वाटतात हो. आणि मला माहितीये मरायला आलेला माणूस, ज्याला माहितीये तो काही दिवसात मरणार आहे. तेव्हा तो माणूस सगळं खरं खरं बोलून जातो. तसं मी जेव्हा या घरातून जाणार होते ना, मला माहित होतं मी जाणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना खरं खरं बोलून गेले. तेव्हा मी अभिजीला बोलले, स्टँड घे. पलटू नकोस.”

त्यानंतर डीपी म्हणाला, “मी आणखी एक वाक्य बोललो होता” त्यावर अंकिता म्हणाली की, विश्वास कोणावर ठेवायचा…हे माझ्या लक्षात आहे. मग डीपी आपल्याचं ग्रुपवर अविश्वास दाखवत म्हणाला, “हा ग्रुप जो तू इतका सोपा समजतेस तो सगळ्यात पहिला घाव तुझ्यावर आणि माझ्यावर घालणार आहे.”

दरम्यान, अंकिता व धनंजयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अजूनही अंकिता व धनंजयचा आपल्या ग्रुपवर विश्वास नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता पुढे दोघं कशाप्रकारे खेळतायत? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link