लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला, पण पैसे कधी येणार? सप्टेंबरमध्ये अर्ज भरल्यावर किती पैसे मिळणार? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे!

Ladki Bahin Yojana Q & A: महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत याकरता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योनजेसाठी राज्यभराली कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तर, आतापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधीही मिळाला आहे. परंतु, अर्ज भरूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? यासह तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तेर आज जाणून घेउयात.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरू शकतो का?

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार १५ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरायचे होते. परंतु, विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांतील घोळामुळे ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. परंतु, ३१ ऑगस्टपर्यंतही अनेक महिलांनी अर्ज भरले नसल्याने ही मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर आताही अर्ज भरू शकता.

या योजनेसाठी जॉइंट अकाऊंट चालेल का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतःकरता करावा याकरता या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेसाठी जॉइंट अकाऊंटधारक महिला पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे तुमचं स्वतंत्र खातं नसेल तर तुम्ही नजिकच्या कोणत्याही बँँकेत जाऊन नवं खातं उघडू शकता.

सप्टेंबर महिन्यात अर्ज भरल्यानंतर नक्की किती रुपये येणार?

ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट अशा दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना तीन महिन्याचे पैसे मिळणार की एक महिन्याचेच मिळणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. मात्र, याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं आदिती तटकरे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही वृत्तावर महिलांनी विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अर्ज स्वीकारला गेला तरीही पैसे का आले नाहीत?

अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत. परंतु, अद्यापही पैसे आलेले नाहीत, असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे एकदा चेक करा. जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन तत्काळ लिंक करून या. या प्रक्रियेला फार दिवस लागत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक झाल्यास तुमच्या खात्यात पैसे येतील. जर लिंक असूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही थोडावेळी प्रतिक्षा करू शकता, असं आदिती तटकरे यांच्या कार्यालयातून कळवण्यात आलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link