LPG Price Hike:तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ केली आहे. 1 जानेवारी 2026 पासून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई सारख्या प्रमुख शहरांसह देशभरात एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत.

LPG Price Hike: 2026 च्या पहिल्या दिवशी महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या किमती 111 रुपयांनी वाढल्या;
LPG Price Hike: वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ (LPG Cylinder Price Hike) केली आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांसोबतच देशभरात 1 जानेवारी 2026 पासून हे दर वाढले आहेत.
तेल कंपन्यांनी किंमतीत केलेली ही वाढ 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरवर असून प्रति सिलेंडर 111 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, 14 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन दर 1 जानेवारी 2026 पासून लागू केले जातील.
जाणून घ्या नवीन दर
- मुंबईमध्ये 1531.50 रुपयांना मिळणारा एलपीजी सिलेंडर आता 1642.50 रुपयांना मिळणार आहे.
- दिल्लीमध्ये आतापर्यंत 1580.50 रुपयांना मिळणारा 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर आता 1691.50 रुपयांना मिळणार आहे.
- कोलकातामध्ये याची किंमत 1684 रुपयांवरून वाढवून आता 1795 रुपये करण्यात आली आहे.
- चेन्नईमध्ये याची किंमत 1739.5 रुपयांवरून वाढवून 1849.50 रुपये करण्यात आली आहे.
घरगुती गॅसचा हिशोब काय?
देशातील बहुतेक शहरांमध्ये घरगुती गॅसचे दर जवळपास 850 रुपये ते 960 रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडर 853 रुपयांना मिळत आहे, तर मुंबईमध्ये याची किंमत 852.50 रुपये आहे. लखनऊमध्ये सिलेंडर 890.50 रुपये, अहमदाबादमध्ये 860 रुपये आणि हैदराबादमध्ये 905 रुपयांना मिळत आहे. तर, वाराणसीमध्ये याची किंमत 916.50 रुपये आणि पटनामध्ये 951 रुपये नोंदवण्यात आली आहे.
किंमत कशी ठरते?
सिलेंडरची किंमत अनेक कारणांमुळे ठरते. याची गणना मुख्यत्वे इम्पोर्ट पॅरिटी प्राईस (IPP) च्या आधारावर केली जाते. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसची किंमत, डॉलर आणि रुपयामधील विनिमय दर, वाहतूक खर्च, विमा आणि टॅक्ससारख्या खर्चांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, प्रत्येक राज्यामध्ये टॅक्स आणि वितरणाशी संबंधित खर्च वेगवेगळा असतो.
