पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीचे शक्तिप्रदर्शन
रामटेक भूमीवर प्रभू श्रीरामाांचे पाऊले पडली आहे. या भूमीचे कार्य करण्याचे मला सौभाग्य प्राप्त झालेआहे. देशाचे लोकनेते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व महायुतीचे राज्याचे मुख्यमांत्री तसेच शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे जेष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार याांनी टाकलेल्या विश्वासामुळे
माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला रामटेक लोकसभा क्षेत्राचा विकास करण्याची सांधी मिळाली आहे. जेव्हा पासून माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा पासून महायुतीमधील सर्व पक्षाचे पदाधिकारी व सकाळपासून ते सायंकाळपर्यंत उन्हातानाची तमा न बाळगता जनसांवाद रथ यात्रेच्या प्रचार मोहिमेत सहभागी होत आहे. लोकनेते नरेंद्र मोदीजीयांना तिसऱ्यांदा पंतप्रधान जर बनवायचे असेल तर रामटेकमधून धनुष्य बाणाला दिल्लीच्या तख्त्यावर न्यावे लागणार, असे मत महायुतीचे उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निवडणुकीचे रामटेक क्षेत्राचे शिवसेनेचे उमेदवार राजू देवनाथ पारवे याांनी व्यक्त केले.
बुधवारी पांतप्रधान नरेंद्र मोांदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित विशाल सभेत राजू पारवे बोलत होते. कन्हान पोलीस स्टेशन जवळील बुक बॉण्ड मैदानावर असलेल्या प्रचार सभेत प्रमुख पाहुण्याांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपुर लोकसभेचे उमेदवार तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी कााँग्रेसचे जेष्ठ नेते खा. प्रफुल पटेल, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर, बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्षा ऍड. सुलेखा कुंभारे, माजी खासदार कृपाल तुमाने आदींची मंचावर उपस्थिती होती.
उमरेड विधानसभा क्षेत्रात आमदार राहून मी गेली साडेचार वर्षे जी विकासकामं केली आहेत आपल्या सर्वाना माहिती आहे. महायुतीने माझ्यावर अत्यंत विश्वास टाकून मला रामटेक लोकसभा निवडणुकीचा उमेदवार बनण्याची सांधी दिली, त्याच सोन करण्यासाठी मला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याांची मोठी साथ लागणार आहे. त्यामुळे रामटेकच्या विकासासाठी केंद्र व राज्याच्या विविध योजना राबवून काम करण्याचा माझा मानस असल्याचेही राजू पारवे यावेळी म्हणाले. जर आपल्याला रामटेकचा विकास प्रगतीपथावर न्यायचा असेल तर आपल्याला प्रभू श्रीरामाच्या पद स्पर्शाने पावन या भूमीतून धनुष्य बाणाला दिल्लीच्या तख्त्यावर न्यावे लागणार. आपण माझ्यावर टाकलेल्या
विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि पूर्ण निष्ठेने काम करणार. तसेच लोकाभिमुख कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहणार. येणाऱ्या 19 तारखेला आपण सर्व मतदाराांनी ईव्हीएम मशीनच्या पहिल्याच क्रमाांकाच्या धनुष्य बाण चिन्हाचं बटन दाबून पुन्हा भगवा फडकवण्याची सांधी आपण मला देणार अशी मी आशा बाळगतो असेही राजू पारवे यावेळी म्हणाले.